“श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘योग दिन’ व ‘मल्लखांब दिन’ उत्साहात साजरे”

चिंबळी (प्रतिनिधी) – २१ जून २०२५ रोजी श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, चिंबळी येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ व ‘राष्ट्रीय मल्लखांब दिन’ अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात साजरे करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर योग प्रशिक्षक श्री. प्रशांत तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, विविध योगासने, प्राणायाम, व ध्यानधारणा सादर केली. योगाचे आरोग्यदायी महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून दिले.

दुसऱ्या सत्रात मल्लखांब मार्गदर्शक श्री. दयानंद पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी दोरी व लाठी मल्लखांबचे थरारक प्रकार सादर केले. विद्यार्थ्यांच्या समतोल, लवचिकता व धाडसाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.शिवाजीराव गवारे सर व संस्थेच्या सचिव मा.सौ.विद्याताई गवारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या प्राचार्या सौ. अनिता वसंत टिळेकर मॅडम यांनी भूषवले. त्यांच्यासह संस्थेच्या संचालिका सौ.रुपालीताई पवळे मॅडम,सौ. सुनीताताई नाकट मॅडम, सौ. अनिता लंके मॅडम, सौ. विद्या सावंत मॅडम, पर्यवेक्षिका मोनाली मुंगसे मॅडम, शोभा तांबे मॅडम, सपना टाकळकर मॅडम, अजित थोरात सर,दिपाली थोरात मॅडम, रूपाली सपकाळ मॅडम, योगिता पाटील मॅम,स्मिता नलगे मॅडम,योग शिक्षक श्री. प्रशांत तांबे सर, मल्लखांब शिक्षक श्री‌. दयानंद पाटील सर, श्री जुबेर शेख सर, सौ. माधुरी गरुड, श्री. कृष्णकांत कांबळे सर,निखिल कांबळे सर, सिद्धेश धोंडगे सर, विशाल डोळस सर,अनिल केदार,शंकर लांडगे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.

प्राचार्य मॅडम आपल्या भाषणात म्हणाल्या, “योग व मल्लखांब हे केवळ व्यायाम नव्हे, तर जीवनशैलीचे मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे. विद्यार्थ्यांनी याचा नियमित सराव करून शरीर व मन दोन्ही निरोगी ठेवावे.”

कार्यक्रमाचे संयोजन शाळेच्या क्रीडा विभागाने केले असून सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी उत्कटतेने पार पाडले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेची जाणीव करून देणारा ठरला.

news portal development company in india
marketmystique