” उत्सव तीन रंगाचा,
उत्सव देश प्रेमाचा
उत्सव स्वातंत्र्य दिनाचा
श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज व श्री समर्थ पतसंस्था मध्ये 79 वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभात फेरी, स्काऊट गाईड व आरएस.पी.च्या विद्यार्थ्यांचे संचलन,देशभक्तीपर गीते, अध्यक्ष, प्राचार्य , शिक्षक व विद्यार्थी यांची भाषणे या वेळी सादर करण्यात आली .
संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ माननीय श्री संभाजीशेठ गवारे, श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ व श्री समर्थ पतसंस्थेचे अध्यक्ष मा.श्री.शिवाजीराव गवारे सर, श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या
सचिव मा.सौ.विद्याताई गवारे मॅडम, संस्थापक मा.श्री बबनराव गवारे,मा.सौ सुमनताई गवारे . श्री समर्थ मल्टीस्टेट चे संचालक मा.श्री. सुभाषराव भुजबळ , मा.संतोषशेठ गवारे,
मा. श्री. ज्ञानेश्वर भाऊ ठाकूर,
मा. श्री उमेश येळवंडे, श्री समर्थ पतसंस्थेच्या संचालिका
सौ नंदाताई येळवंडे, मा.सौ रूपालीताई पवळे, मा.सौ. सुनिता ताई नाटक, मा.सौ चंदाताई पवार तसेच पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी मा.श्री.अमोल गवारे सर, प्राचार्या मा.सौ.अनिता टिळेकर मॅडम,बस,संघटनेचे अध्यक्ष मा.श्री संतोष गवारे सर , मा.श्री सुभाषराव भुजबळ व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदी मान्यवरांच्या
हस्ते श्री समर्थ पतसंस्था व श्री समर्थ विद्यालयासमोरील ध्वजपुजन व ध्वजारोहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संचालक मा.श्री. हनुमंत शेठ कातोरे सर होते .
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इ.१० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री समर्थ पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त पाढे पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या त्यातील उत्कृष्ठ विजेत्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
देशासाठी बलिदान देणाऱ्या, स्वातंत्र्यांनंतर देश उभारणी करणाऱ्या अगणित क्रांतिवीरांना,सीमेवर हुतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून वंदन केले. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील सांस्कृतिक विभागाने केले होते.शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री अमोल गवारे सर व सौ. अनिता टिळेकर मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
श्री समर्थ पतसंस्थे तर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.






