लोणावळा – सम्यक विचार संघ, लोणावळा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समाजकारणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. नरसिंग गोविंद सोमवंशी यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी संघाचे संस्थापक श्री. बी. एस. कांबळे, अध्यक्ष विनोद गायकवाड, खजिनदार बी. डी. साळवे, प्रशांत कुंभारे (कुंभारे कन्स्ट्रक्शन व प्रणाम फिल्म्स), ग्रामपंचायत सदस्या सौ. पंचशील मोरे, पोलीस पाटील प्रियंका मोरे, संजय गायकवाड, समाजभूषण माऊली ससाणे, वर्धे सर, माने सर, जयसिंग कांबळे, सारिका पडवळ, गौतम सपकाळ, रमा वाघे, कांता मोरे, बबन ओव्हाळ, मोरे सर यांसह अनेक मान्यवर व सभासद उपस्थित होते.
पुरस्कार वितरणाचा मान पू. भंते महेंद्र बोधी यांना लाभला. उपस्थित मान्यवरांनी श्री. सोमवंशी यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






