जि.प. शाळा वाघजाईनगर येथे मदरसन कंपनीकडून भव्य हस्तांतरण व उद्घाटन सोहळा

जिल्हा परिषद शाळा वाघजाईनगर येथे मदरसन कंपनीच्या सामाजिक दातृत्वातून ३ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन, ६ इंटरॅक्टिव्ह पॅनल टीव्ही संच आणि २०० बेंचेस यांचा भव्य हस्तांतरण सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास मदरसन कंपनीचे क्वालिटी हेड रामचंद्र पाटील, संतोष साळुंके (सिनियर मॅनेजर फायनान्स), पंकज मालोकर (HR), महेश उगले (असिस्टंट जनरल मॅनेजर), सिल्फा सिंग (असिस्टंट मॅनेजर), सुवर्ण लता – मदरसन ट्रस्ट, तसेच स्मृती रिझवानी (असिस्टंट मॅनेजर) आदी मान्यवर उपस्थित होते.

पाण्याच्या टाकीचे पूजन, श्रीफळ फोडून आणि फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूजा शिळवणे, मनिषा शिळवणे व राधिका शिळवणे यांनी सर्व पाहुण्यांचे पारंपरिक औक्षण करून स्वागत केले तसेच फेटे बांधून जंगी जल्लोषात मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.


मदरसन कंपनीचा सामाजिक उपक्रम – ग्रामस्थांकडून मनःपूर्वक सन्मान 

मदरसन कंपनीने शाळेला दिलेल्या लाखो रुपयांच्या साहित्याबद्दल त्यांचा गौरव म्हणून शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथशेठ शेडगे, मा.अध्यक्ष बाळासाहेब शिळवणे, शिवसेना उप तालुका प्रमुख संतोष शिळवणे यांनी मनोगत व्यक्त करून मदरसन कंपनीचे मनापासून आभार व्यक्त केले.

कंपनीचे प्रमुख पाटील साहेब यांनी –

“शाळेला दिलेल्या या सर्व सुविधा शैक्षणिक प्रगतीसाठी वापराव्यात. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती वेगाने होईल,”
असे सांगून शाळेचे अभिनंदन केले.

कार्यक्रमात पाहुण्यांना फळे व सुकामेवा नाश्ता देण्यात आला.


उपस्थित मान्यवर

मुख्याध्यापक दत्तात्रय शेवकरी,
मा. अध्यक्ष पांडुरंग शिळवणे,
मा. उपाध्यक्ष सचिन मेणे,
दत्तात्रय झुंगळाजी शिळवणे,
योगेश राऊत,
मा. अध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र शिळवणे,
युवा उद्योजक रविंद्र शिळवणे, युगंधर शिळवणे,
दत्तात्रय महिपती शिळवणे, रोहिदास शिळवणे,
शशिकांत सावळे, शंकर गुजर, संतोष शिळवणे
तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

news portal development company in india