दिल्ली येथे दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पद्मभूषण साईना नेहवाल यांच्या हस्ते
Inspiring Indians Award प्रदान करण्यात आला.
राजगुरूनगर येथे गेली २२ वर्षे अविरतपणे सुरू असलेल्या हुतात्मा राजगुरू सेवा कार्यासह साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन हा बहुमान देण्यात आला.
हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नसून, पुढील काळात अधिक जबाबदारीने व निष्ठेने समाजसेवेस वाहून घेण्याची प्रेरणा आहे.
या प्रवासात लाभलेले आपले प्रेम, सहकार्य व सद्भावना अमूल्य असून ती अशीच कायम राहो.
यावेळी श्री समर्थ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री शिवाजीराव गवारे यांनी अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.






