श्री समर्थ ग्रुप संचलित गोरेश्वर ग्रामीण मल्टीस्टेट पतसंस्थेच्या जाधववाडी येथील नवीन शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या शाखेचे उद्घाटन संस्थापक/आधारस्तंभ संभाजीशेठ गवारे, संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे व बबनराव गवारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या उद्घाटन समारंभास प्रमुख उपस्थिती म्हणून गणेशशेठ सस्ते, बबनराव आल्हाट, अंकुश नेवाळे, संतोष नेवाळे, प्रशांत कोल्हे, वैभव जामदार उपस्थित होते.
तसेच संचालक सल्लागार मंडळातील मोई सोसायटीचे चेअरमन सादीक गवारे, सर्जेराव गवारे, तानाजी फलके, वसंत मुऱ्हे, भगवान साकोरे, दत्तात्रय नाणेकर, कैलास बुर्डे, संतोष तापकीर, बाळासाहेब येळवंडे, शिवाजी पानसरे, अजय आल्हाट, गिरीश येळवंडे, माऊली ठाकुर, सुरज वाल्हेकर, शेखर करपे, नितीन करपे, ॲड. मनोहर जंबुकर, गणेश किवळे, आशिष भालेकर, संकेत चव्हाण, केरू सातव, अर्जुन जाधव, मिलिंद चौगुले, गोविंद साळुंखे, विकास मांदे, भारत सातपुते, दिलीप बोऱ्हाडे, चंद्रकांत आहेर, अनिकेत टिळेकर, अरुणा गवारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीईओ अमोल गवारे व सल्लागार किसन देशमुख यांनी केले. तर उपस्थितांचे आभार विभागीय अधिकारी अर्जुन जाधव यांनी मानले. या नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांना आधुनिक बँकिंग सुविधा सुलभपणे उपलब्ध होणार असून स्थानिक आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






