समर्थ ग्रुप संचलित गोरेश्वर ग्रामीण मल्टिस्टेट शेलपिंपळगाव शाखा येथे नववर्ष मकर संक्रांतीनिमित्त महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात

समर्थ ग्रुप संचलित गोरेश्वर ग्रामीण मल्टिस्टेट शेलपिंपळगाव शाखा येथे नववर्ष व मकर संक्रांत निमित्त १५ जानेवारी या दिवशी महिलांसांठी हळदी कुंक कार्यक्रमाचे आयोजन शेलपिंपळगाव शाखेचे व्यवस्थापक व सर्व कर्मचारी वृंद यांच्या मदतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले तसेच चहापाणी आणि अल्पोपहार देण्यात आला. महिलांना हळदी कुंकवासोबत वाण देऊन सर्वांना कॅलेंडर वाटप केले संस्थेची माहिती सर्वांना देण्यात आली
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक मा. डॉ कालीचरण दौंडकर, सल्लागार मा. श्री बबनराव आवटे, संचालक मा. श्री रोहिदास आरगडे, संचालक मा. विराज मोहिते, संचालक मा. श्री संतोष पवळे कार्यकारी संचालक मा. श्री हरिदास वाडेकर, कार्यकारी संचालक मा. श्री किसन देशमुख, विभागीय अधिकारी मा. श्री अर्जुन जाधव सर उपस्थित होते.

news portal development company in india