मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर श्री समर्थ पतसंस्था यांच्या वतीने महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या चिंबळी फाटा, खालुंब्रे, निघोजे, सोळू, नाणेकरवाडी, चऱ्होली, सोमाटणे व हिंजवडी या आठही शाखांमध्ये हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात पंचक्रोशीतील सुमारे ८७५ महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान श्री समर्थ ग्रुपच्या सचिव विद्याताई गवारे, रूपालीताई गवारे, वैष्णवीताई गवारे, वंदनाताई साखरे व यशोदा काळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
महिलांनी परस्पर विचारांची देवाणघेवाण करत एकमेकांना हळदी-कुंकवाने औक्षण केले. तसेच उपस्थित सर्व महिला सभासदांना संस्थेच्या वतीने वाण देऊन सन्मानित करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संबंधित शाखांतील महिला कर्मचाऱ्यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने पार पाडले. महिलांच्या सहभागामुळे व आपुलकीच्या वातावरणामुळे मकर संक्रांतीचा हा उपक्रम संस्मरणीय ठरला.






