सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज निघोजे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सकाळी ६.३० वाजता शाळेच्या प्रांगणात उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ध्वजारोहणाची सर्व तयारी केली होती. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरी काढून करण्यात आली प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
शाळेतील ध्वजारोहण श्री. नंदकुमार विष्णू बेंडाले यांच्या हस्ते झाले. मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी संचलन करत ध्वजाला मानवंदना दिली. पहिली ते चौथीच्या गटातील विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली.
गणेश उत्सवानिमित्त शाळेमध्ये गणपती स्तोत्र व प्रश्न -उत्तर स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना श्री समर्थ स्कूल कडून प्रमाणपत्र देण्यात आली.
कार्यक्रमाच्या वेळी श्री. नंदकुमार बेंडाले , श्री. बाळासाहेब येळवंडे, श्री. समीर गवारे सर, प्राचार्या सौ. पल्लवी कुटे मॅम, उपप्राचार्या सौ. ज्योती येळवंडे मॅम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् आणि मुलांना खाऊ वाटप करून करण्यात आली.






