केळगाव :
भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन दिनांक २६ जानेवारी रोजी श्री समर्थ प्री-प्रायमरी स्कूल, केळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्वजाला मानवंदना देऊन करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे, कराटे प्रात्यक्षिके तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. लहान विद्यार्थ्यांनी साकारलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या प्रसंगी मुख्याध्यापिका मॅडम यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांनी शिस्त, एकता व देशप्रेम जोपासावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे संस्थापक श्री. शिवाजीराव गवारे सर व सौ. विद्याताई शिवाजीराव गवारे मॅडम यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी राहुल वामन, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. राहुल गुंड , श्री. प्रताप वहिले, श्री. विकास गुंड व श्री. सनी विरकर हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.






