श्री समर्थ किड्स स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘श्री समर्थ किड्स स्कूल’ मध्ये ध्वजारोहणाचा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​सकाळी ठीक ८:३० वाजता शाळेच्या प्रांगणात तिरंगा मानवंदना केली.लहान मुलांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्ये सादर केली.
​विद्यार्थ्यांनी झाशीची राणी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी , नेहरूजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर महापुरुषांची वेशभूषा करून त्यांच्या विचारांची मांडणी केली.
शाळेच्या मुख्याध्यापिका मयुरी कुरणे यांनी आपल्या भाषणात संविधानाचे महत्त्व सांगताना, “आजची ही लहान मुलेच उद्याच्या समर्थ भारताचे भविष्य आहेत,” असे उद्गार काढले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली.
​वंदे मातरम् आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे संस्थापक श्री. शिवाजीराव गवारे सर व सौ. विद्याताई शिवाजीराव गवारे मॅडम यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका मयुरी कुरणे, अ‍ॅडमिन नेहा बांगर मॅडम ,शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांचे सहकार्य लाभले.

news portal development company in india
soical Sharing