श्री समर्थ पतसंस्थेतर्फे खेड तालुक्यातील शाळांना ५१,००० पुस्तकांचे वाटप

खेड (पुणे) : श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून खेड तालुक्यातील विविध शाळांना स्वातंत्र्यसेनानी, संत व महापुरुषांवरील एकूण ५१,००० पुस्तके मोफत वाटप करण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, संस्कार, इतिहासाची जाणीव आणि प्रेरणादायी विचार रुजावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
हा उपक्रम संस्थापक आधारस्तंभ संभाजीशेठ गवारे यांच्या मार्गदर्शनातून, संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गवारे यांच्या संकल्पनेतून तसेच संस्थेच्या सर्व शाखांचे संचालक, सल्लागार मंडळ व कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.
पुस्तक वाटप कार्यक्रमास शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. श्री समर्थ पतसंस्थेचा हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास्पद ठरला असून, शिक्षण व संस्कार क्षेत्रात संस्थेचे योगदान उल्लेखनीय असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
रौप्य महोत्सव वर्षानिमित्त भविष्यातही असेच सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संस्थेचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

news portal development company in india