पुणे विद्यापीठातून प्रथम श्रेणीत ॲडव्होकेट पदवी; तीन विद्यार्थिनींचे उल्लेखनीय यश
मोई, ता. खेड : पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत (First Class) उत्तीर्ण होत कु. अंकिता संभाजी गवारी, कु. वैष्णवी अविनाश करपे आणि कु. उर्मिला ज्ञानेश्वर येळवंडे यांनी ॲडव्होकेट पदवी संपादन करून उल्लेखनीय यश मिळविले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फेही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक श्री. संभाजीशेठ गवारी तसेच अध्यक्ष श्री. शिवाजीराव गवारी यांनी तिन्ही नूतन ॲडव्होकेट्सना शुभेच्छा देताना सांगितले की, “शिक्षण, प्रामाणिकपणा आणि समाजसेवा या मूल्यांच्या आधारावर त्यांनी न्यायव्यवस्थेत उत्कृष्ट कार्य करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”
श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित परिवाराने तिन्ही यशस्वी विद्यार्थिनींना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या यशाचा गौरव केला.






