श्री समर्थ विद्यालयात शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त व्याख्यान

श्री समर्थ विद्यालयात शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त व्याख्यान

चिंबळी, ता. १ : चिंबळी फाटा येथील श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून भारत इतिहास समितीचे सदस्य व प्रसिद्ध शिवशंभू चरित्र अभ्यासक मा. श्री. ऋत्विक कुलकर्णी सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव गवारे सर होते.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगवी गटाचे प्रचारक मा. श्री. संभाजीराव भोसले सर, चाकण तालुका प्रचारक मा. श्री. गौतम गुजराती सर, रा.स्व.से. संघाचे चाकण तालुका कार्यवाहक मा. श्री. शेखर करपे सर, श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अमोल गवारे सर, वसुली विभाग अधिकारी मा. श्री. बाळासाहेब लांडगे सर, ऍडव्होकेट मा. श्री. दुर्योधन कांबळे सर, शाखा व्यवस्थापक प्रज्वल लेंडघर सर, विद्यालयाच्या प्राचार्या मा. सौ. अनिता टिळेकर मॅडम तसेच समन्वयक मा. सौ. अनिता लंके मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख व्याख्याते मा. श्री. ऋत्विक कुलकर्णी यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ऐतिहासिक महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमागील दूरदृष्टी, राष्ट्रनिर्मितीतील त्यांचे योगदान आणि आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श कसा घ्यावा याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन, आभारप्रदर्शन आणि कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.

news portal development company in india
soical Sharing