खेड सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ मा. श्री. नामदेव आप्पा वाडेकर साहेब यांचे जावई श्री. संदीप पवार यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

खेड सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ मा. श्री. नामदेव आप्पा वाडेकर साहेब यांचे जावई श्री. संदीप पवार यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

खेड : खेड सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ मा. श्री. नामदेव आप्पा वाडेकर साहेब यांचे जावई तथा राज्य कर (सेल टॅक्स) विभागातील अधिकारी श्री. संदीप पवार यांना आर्थिक वर्ष २०२५–२०२६ मध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

राज्य कर विभागातील महसूलवाढ, पारदर्शक प्रशासन, कार्यक्षम अंमलबजावणी तसेच कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक सेवेमुळे श्री. पवार यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत शासनाने हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान केला.

या सन्मानामुळे खेड तालुक्यासह वाडेकर आणि पवार परिवाराचा गौरव वाढला असून विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून श्री. संदीप पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्री. संदीप पवार यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

news portal development company in india
soical Sharing