श्री समर्थ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नाणेकरवाडी मधील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
सुप्रसिद्ध लेखक व कवी दासू वैद्य यांच्या “लाडेलप्पा” या नव्या दमाच्या बालकादंबरीचे ‘किशोर’ मासिकाच्या जानेवारी २०२६ अंकापासून क्रमशः प्रकाशन होत आहे. या कादंबरीसाठी तयार करण्यात आलेल्या संगीतबद्ध शीर्षकगीताला आपला विद्यार्थी कु रुद्र खिल्लारे ( इ ९ वी सेमी ) याने आपल्या सुरेल आवाजात स्वरबद्ध करून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
ही अभिमानास्पद संधी मिळवून रुद्रने आपल्या शाळेचे, पालकांचे आणि शिक्षकांचे नाव उंचावले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे तसेच त्याच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन.
श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. शिवाजीराव गवारे सर, मा. सचिव सौ. विद्याताई गवारे मॅडम, प्राचार्या सौ. विद्या पवार मॅडम, COO सौ.अश्विनी देवकर मॅडम, सर्व उपप्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व संपूर्ण श्री समर्थ परिवाराच्या वतीने कु रुद्र खिल्लारे याचे मनःपूर्वक अभिनंदन! व *त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
– श्री समर्थ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नाणेकरवाडी ( खराबवाडी)






