श्री समर्थ पतसंस्थेत डोळसनाथ पतसंस्थेचा अभ्यास दौरा

चिंबळी फाटा, दि. १५ जुलै : डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकारी, संचालक व अधिकाऱ्यांचा श्री समर्थ पतसंस्था, चिंबळी फाटा येथे अभ्यास दौरा संपन्न झाला.

या दौऱ्यात डोळसनाथ पतसंस्थेचे संस्थापक व पुणे जिल्हा ना. सह. पतसंस्था फेडरेशनचे सचिव श्री. संतोषजी भेगडे, फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप सोनवणे, प्रशिक्षण विभाग प्रमुख सौ. नीलाक्षी राऊत, तसेच डोळसनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. शरद भोगाडे, उपाध्यक्ष श्री. शंकर भेगडे, सचिव श्री. अतुल राऊत, खजिनदार श्री. अमित भसे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनिल भोमे, संचालक श्री. राहुल पारगे, श्री. अंकुश आंबेकर, व्यवस्थापक श्री. कुणाल भेगडे व श्री. रामचंद्र पानसरे, तसेच सल्लागार श्री. पंकज कठाणे उपस्थित होते.

यावेळी श्री समर्थ पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमोल गवारे यांनी संस्थेची कार्यपद्धती, सभासद सेवा, ठेवी संकलन, कर्ज वितरण, तंत्रज्ञानाचा वापर आणि संस्थेच्या प्रगतीविषयी सविस्तर माहिती दिली. पतसंस्थेचे कर्ज अधिकारी श्री प्रदीप लांडगे,अंतर्गत तपासणी अधिकारी श्री प्रज्वल लेंडघर व बिझनेस हेड श्री दुर्योधन कांबळे यांनी त्यांच्या विभागाची माहिती उपस्थितांना दिली. सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर दोन्ही संस्थांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन परस्पर अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी श्री समर्थ पतसंस्थेचे चेअरमन श्री. शिवाजीराव बबनराव गवारे व श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या सचिव सौ. विद्याताई शिवाजीराव गवारे यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना श्री. संतोष भेगडे यांनी हा अभ्यास दौरा संस्थेच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तर चेअरमन श्री. शिवाजीराव बबनराव गवारे यांनी सहकार क्षेत्राच्या विकासासाठी परस्पर सहकार्य व ज्ञानाची देवाणघेवाण अशा उपक्रमांतून अधिक दृढ होईल, असे प्रतिपादन केले.

news portal development company in india
soical Sharing