राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्री समर्थ ज्युनियर कॉलेजच्या आर्यन वरकडची सुवर्णकामगिरी!

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्री समर्थ ज्युनियर कॉलेजच्या आर्यन वरकडची सुवर्णकामगिरी!

🏆 ९८ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
चाकण, प्रतिनिधी :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे आयोजित राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्री समर्थ ज्युनियर कॉलेज, खराबवाडी (चाकण) येथील विद्यार्थी आर्यन नितीन वरकड याने ९८ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आर्यनची मणिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्याने महाविद्यालयासह चाकण परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
आर्यनने आपल्या जिद्द, सातत्यपूर्ण सराव, कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या बळावर राज्यस्तरीय स्पर्धेत हे घवघवीत यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील गौरवशाली वाटचालीत आणखी एका सुवर्णक्षणाची भर पडली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव गवारे सर, संस्थेच्या सचिव मा. सौ. विद्याताई गवारे मॅडम, महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. विद्या पवार मॅडम यांनी आर्यनचे विशेष कौतुक करत त्याला आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
आर्यनच्या या यशस्वी वाटचालीत मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री. सागर गाडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आर्यनचे अभिनंदन करत राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
राज्यस्तरीय सुवर्णपदकानंतर आता राष्ट्रीय स्पर्धेतही आर्यनच्या दमदार कामगिरीकडे संपूर्ण चाकण परिसराचे लक्ष लागले आहे.

news portal development company in india
Recent Posts