स्वर्गीय संतोष जोशी यांच्या कुटुंबास निवडणूक आयोगाकडून १५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द

खेड तालुक्यातील इंदिराजी माध्यमिक विद्यालय, मोई चे आदर्श क्रीडाशिक्षक स्वर्गीय संतोष (तात्या) जोशी यांचे लोकसभा निवडणूक कर्तव्यावर असताना दुःखद निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना निवडणूक आयोगाकडून पंधरा लाख रुपयांचा धनादेश खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, जीवन कोकणे, केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर, विजय सुरकुले, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नितीन वरकड, रामदास रेटवडे, लतीफ शेख आणि निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते जोशी कुटुंबियांना हा धनादेश देण्यात आला. जोशी कुटुंबियांनी सर्वांचे धनादेश मिळाल्याबद्दल ऋण व्यक्त केले आहे.खेड तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांनी ही पूर्ण प्रक्रिया पार पडताना ज्यांच्याकडून सहकार्य मिळाले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

news portal development company in india
Recent Posts