श्री समर्थ पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.

श्री समर्थ पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी जय गणेश बँक्वेट हॉल, मोशी येथे पार पडली सदर सभेत सन 2023-24 आर्थिक वर्षातील पत्रकांना मान्यता देण्यात आली त्याचप्रमाणे सर्व सभासदांना 10% टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सभेवेळी मा. तानाजी कवडे मा. सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले. तालुक्यातील ज्या विद्यार्थ्यांचे पोलीस दलात नियुक्ती झाली आहे अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे संस्थेतील गुणवंत कर्मचारी, गुणवंत दैनंदिन ठेव प्रतिनिधी व उत्कृष्ठ शाखा यांचा सत्कार करण्यात आला.
सदर सभेस संस्थेचे संस्थापक श्री संभाजीशेठ गवारे, उपाध्यक्षा सुरेखाताई गवारे, खजिनदार संतोषशेठ गवारे, संचालक सुधीरशेठ मु-हे, विद्याताई गवारे त्याचप्रमाणे सर्व संचालक व सल्लागार मंडळ उपस्थित होते. संस्थेचे संचालक डॉ. सागर सोमवंशी व दिगंबर ठोंबरे, विठ्ठल ठाकुर,संभाजी अवघडे, हिरामण येळवंडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री शिवाजीराव गवारे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले व संस्थेची पुढील ध्येय धोरणे व रौप्य महोत्सव वर्षाबाबत माहिती सांगितली. सभेचे सुत्रसंचालन सीईओ अमोल गवारे, शाखा व्यवस्थापक अर्जुन जाधव, संतोष साकोरे यांनी केले तर उपस्थित सभासदांचे आभार हनुमंत कातोरे यांनी मानले. पसायदानाने सभेची सांगता झाली, त्यानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.

news portal development company in india
Recent Posts