श्री समर्थ ची यशाची परंपरा कायम

खराबवाडी ता.५ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने( एच. एस. सी.बोर्ड) फेब्रुवारी व मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार (ता.०५ मे) जाहीर झाला असून नाणेकरवाडी ( खराबवाडी ) येथील श्री समर्थ ज्युनिअर कॉलेजने यावर्षीही निकालाची परंपरा कायम राखली आहे.विद्यालयाचा यंदाचा १२वी चा निकाल १००% लागला असल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्या सौ विद्या पवार मॅडम यांनी दिली. श्री समर्थ ज्युनिअर कॉलेज खराबवाडी या विद्यालायातून सन २०२४ –२०२५ साठी एकूण २५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली . विद्यालयाचा शाखा निहाय एकूण निकाल पुढीलप्रमाणे आहे.

विज्ञान शाखा =१००%

वाणिज्य शाखा =१०० %

कला शाखा- = १००%

शाखा निहाय गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे आहे.

विज्ञान शाखा
प्रथम क्रमांक –
ओम निवृत्ती घोटेकर ९०.१७ %
सौम्य मनोज ढवंगळे –९०.१७ %
द्वितीय क्रमांक-मृण्मयी पद्मनाभ कुलकर्णी ८७.८३%
तृतीय क्रमांक – श्रेया अनिल धांद्रे ८३.५०%

वाणिज्य शाखा
प्रथम क्रमांक- मनीषा मनोज दीक्षित .८५.३३ %
द्वितीय क्रमांक- शर्वरी शहाजी चौगुले – ७४ %
तृतीय क्रमांक – कुणाल विष्णू जाधव – ७१.५० %

कला शाखा
प्रथम क्रमांक – वेदांत संतोष शिवळे ६२.१७ %
द्वितीय क्रमांक – श्याम श्रीपतराव मोरे ६०.३३ %
तृतीय क्रमांक- प्रांजली भावजी वाघमारे ६०.१७ %

याप्रमाणे शाखा निहाय निकाल लागला असून सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव गवारे सर तसेच संस्थेच्या सचिव सौ. विद्याताई गवारे मॅडम व प्राचार्या सौ. विद्या पवार मॅडम यांनी अभिनंदन केले आहे .त्यांना मार्गदर्शन करणारे सौ अश्विनी देवकर , अंकिता बोरकर , हसीना मानियार , दिगंबर कुलकर्णी , आरती क्षीरसागर , अर्चना पोखरकर , बंडगर तेजश्री , अजय स्वामी , सागर गाडे , पुनम अरुडे , शुभांगी शिंदे , मयुरी शिंदे , स्नेहा दामले , ऐश्वर्या वाडेकर, रवीना सपकाळे , देवयानी जाधव , शितल खंडागळे , मनीषा कुंभार, रेखा वायकुळे , दिपाली पाटील , स्मृती गोंजारी , यांनी मार्गदर्शन केले.श्री समर्थ बस संघटना व श्री समर्थ पतसंस्था यांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

news portal development company in india
marketmystique
Powered by the Tomorrow.io Weather API