समाजसेवा, युवकांचे प्रबोधन, ग्रामीण विकास व लोककल्याणासाठी केलेल्या समर्पित कार्याची दखल घेत महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्र दैनिक पुण्यनगरी यांच्या वतीने ‘समाज मित्र – सन 2025’ हा मानाचा पुरस्कार मा. आशिषभाऊ येळवंडे यांना प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार त्यांच्याद्वारे सातत्याने ग्रामीण भागात राबवण्यात आलेल्या उपक्रमांमुळे, जनसामान्यांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे, तसेच सामाजिक एकोपा निर्माण करण्यात केलेल्या प्रयत्नांची पावती आहे.
त्यांच्या या गौरवामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या त्यांच्या कार्यास पुढील वाटचालीसाठी श्री समर्थ ग्रुपच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !