समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्र ‘दैनिक पुण्यनगरी’ यांच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. यामध्ये महानगाव निघोजे नगरीच्या आदर्श सरपंच सौ. सुनिताताई कैलास येळवंडे यांना देण्यात आला त्याबद्दल त्यांचे श्री समर्थ ग्रुप चिंबळी फाटा यांचे वतीने मन:पूर्वक अभिनंदन !
ग्रामविकास, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य, तसेच ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न यामुळे त्या अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
हा पुरस्कार केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर संपूर्ण गावासाठी गौरवाचा क्षण आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा !