तळेगाव दाभाडे : श्री समर्थ पतसंस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड अभिजीत जांभुळकर यांची महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुका अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली.
ॲड अभिजीत जांभुळकर हे गेली १८ वर्षे विधी व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक व कायदा क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन राज्य अध्यक्ष ॲड सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष ॲड यशवंत खराडे, सचिव ॲड प्रवीण नलावडे तसेच प्रवक्ता ॲड अतिश लांडगे यांनी नियुक्ती केली व त्यांची ही निवड झाली आहे. सदर नियुक्ती प्रमाणपत्र महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
श्री समर्थ पतसंस्था संस्थापक अध्यक्ष मा शिवाजीराव गवारे व पतसंस्थेचे सर्व संचालक सल्लागार मंडळ यांनी या नियुक्ती बाबत ॲड अभिजित जांभुळकर यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.