श्री समर्थ ग्रुप चिंबळी फाटा संस्थापक अध्यक्ष मा शिवाजीराव गवारे यांचा दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून श्री समर्थ ग्रुप चिंबळी फाटा (पतसंस्था, स्कुल अँड कॉलेज, मल्टिस्टेट, असोसिएट, डेव्हलपर्स) यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
यामध्ये पर्यावरणाचे रक्षण व महत्व लक्षात घेऊन विविध जातीच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले, परिसरातील नागरिकांकरिता श्वास हॉस्पीटल व महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, तसेच मंगलम आय केअर शिरगांव व श्रीशा ऑप्टिक वडगांव यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते, यामध्ये परिसरातील सुमारे २४७ नागरिकांना सहभाग घेतला होता.
त्याचप्रमाणे चिंबळी येथील डॉक्टर बनकर यांच्या महाकैवल्य सेवाभावी संस्था गोशाळेस भेट देऊन मदत करण्यात आली. सदर सामाजिक उपक्रमास संस्थापक आधारस्तंभ श्री संभाजीशेठ गवारे, खजिनदार श्री संतोषशेठ गवारे संस्थेचे सर्व संचालक सल्लागार मंडळ, श्री समर्थ ग्रुपच्या सचिव सौ विद्याताई गवारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सीईओ अमोल गवारे, प्राचार्य अनिता टिळेकर, श्री अर्जुन जाधव, श्री संतोष गवारे, श्री संतोष साकोरे यांनी केले.