७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ७८ पथनाट्य सादर …

श्री समर्थ शिक्षक प्रसारक मंडळ मोई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री शिवाजीराव बबनराव गवारे सर व संस्थापिका सचिव मा सौ विद्याताई शिवाजीराव गवारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथनाट्य सादर करण्यात आले .
संस्थेच्या श्री समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंबळी फाटा , नाणेकरवाडी ,महाळुंगे , केळगाव महाळुंगे , आळंदी , खालुंब्रे , डुडुळगाव इत्यादी शाळेच्या शाखांनी चाकण व खेड तालुका परिसरात विविध ठिकाणी हे पथनाट्य सादर केले .
शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकूण ७८ विषयांवर पथनाट्य सादर केले
“मोबाईलचे अतिक्रमण आणि हरवलेले बालपण , रस्ता सुरक्षा , महिला सक्षमीकरण , झाडे वाचवा झाडे जगवा , पृथ्वी वाचवा , पर्यावरण बचाव , अन्नसुरक्षा , मोबाईल सोडा माणसे जोडा , स्वच्छता अभियान कचरा निर्मूलन “ अशा वेगवेगळ्या विषयांवरती विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले . या पथनाट्यस विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले .

news portal development company in india
marketmystique