चिंबळी ता.१५ – श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज व श्री समर्थ पतसंस्था मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभात फेरी, स्काऊट गाईड व आर एस.पी.च्या विद्यार्थ्यांचे संचलन,देशभक्तीपर गीते,सामाजिक उद्बोधन करणारी नाटके,महापुरुषांवरील भाषणे या वेळी विद्यार्थ्यांनी सादर केली.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ स्कूल आणि कॉलेजच्या वतीने ९ ऑगस्ट ‘क्रांती दिन’ते १५ ऑगस्ट ‘स्वातंत्र्य दिन’ पर्यंत संपूर्ण सप्ताह हा ‘क्रांती सप्ताह’म्हणून साजरा करण्यात आला असल्याची माहिती श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.शिवाजीराव गवारे सर व सचिव मा.सौ. विद्याताई गवारे मॅडम यांच्या वतीने सांगण्यात आले.
संस्थेच्या श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चिंबळी फाटा, नाणेकरवाडी, निघोजे,महाळुंगे, केळगाव , खालुम्ब्रे, ,डुडुळगाव,हडपसर, आळंदी, इत्यादी शाळेच्या शाखांनी चाकण व खेड तालुका परिसरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर केली.
विविधतेत एकता, प्लास्टिक बंदी, नशा मुक्त भारत, रस्ते सुरक्षा, स्त्री – पुरुष समानता, झाडे लावा – झाडे जगवा, अन्नसुरक्षा, लोकशाही, मतदान जनजागृती ,मोबाईलचे अतिक्रमण व हरवलेले बालपण, पर्यावरण संवर्धन यासारख्या सामाजिक ७८ज्वलंत विषयांवर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली.
कार्यक्रमातून विविध सामाजिक घटकात अपेक्षित सकारात्मक बद्दल घडून यावा हा उद्देश्य असल्याचे संस्थापक अध्यक्ष श्री.शिवाजीराव गवारे सर यांनी सांगितले.या उपक्रमास समाजातील प्रतिष्ठित नागरिक व पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून समाजातील सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात प्रा.विद्या पवार मॅडम,प्रा.ज्योती येळवंडे,प्रा.वंदना यादव मॅडम,प्रा.अश्विनी वामन,अश्विनी देवकर,शोभा तांबे,मोनाली मुंगसे,सपना टाकळकर,अजित थोरात,साधना आल्हाट,रुपाली पवळे,दीपाली थोरात ,निखिल कांबळे,सिद्धेश धोंडगे,प्रशांत तांबे,अजय स्वामी,सुरज सोमवंशी,सचिन जगताप, श्री समर्थ विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
श्री समर्थ पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी मा. श्री.अमोल गवारे सर, प्राचार्या मा.सौ.अनिता टिळेकर मॅडम,प्राचार्या मा.सौ.वर्षा देशमुख मॅडम यांच्या हस्ते श्री समर्थ पतसंस्था व श्री समर्थ विद्यालयासमोरील ध्वजारोहन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संचालक मा.श्री.उमेशशेठ येळवंडे सर हे होते.
कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेल्या पतसंस्थेच्या संचालिका सौ.नंदाताई येळवंडे, रूपालीताई पवळे, बस संघटनेचे अध्यक्ष श्री.संतोष गवारे, संतोष साकोरे ,प्रदीप लांडगे, संतोष बोराटे,रवींद्र देवरे, श्रीधर कुंभार, व्यंकट कुर्नापल्ले, सोपान मोरे ,सुधीर मुंडे ,गुरूप्रसाद वर्मा ,सुनील वाव्हळ, विष्णू पालवे, आप्पा कोळेकर,सौ.प्रतिभा केंद्रे,रुपाली खैरनार, मीरा भुजबळ,भाग्यश्री वंजारी,सपना गडगे यांच्या हस्ते इ.१० वी व १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
देशासाठी बलिदान देणाऱ्या, स्वातंत्र्यांनंतर देश उभारणी करणाऱ्या अगणित क्रांतिवीरांना,सीमेवर हुतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून वंदन केले. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील सांस्कृतिक विभागाने केले होते.शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.नीलम डोंगरे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.