श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिंबळी फाटा या संस्थेच्या सोमाटणे फाटा या ठिकाणी ०७ व्या शाखेचे उदघाटन रविवार दिनांक ०४/०५/२०२५ रोजी सकाळी १०:०० वा मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. पतसंस्थेची ही ०७ वी शाखा असून, संस्थेच्या ०८ व्या शाखेचे काम हिंजवडी येथे चालू आहे, याआधी संस्थेच्या ०६ शाखा असुन १३६ कोटी रुपयांच्या ठेवी व १०० कोटींचे कर्जवाटप आहे असा एकुण २३६ कोटीचा व्यवसाय आहे, पतसंस्थेस सतत अ ऑडिट वर्ग असुन थकबाकी फक्त ०.६४ टक्के आहे. सदर शाखेचा सोमाटणे व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पतसंस्थेचे संस्थापक/आधारस्तंभ संभाजीशेठ गवारे संस्थापक/अध्यक्ष शिवाजीराव गवारे यांनी केले. सदर कार्यक्रमास मावळ तालुका पंचायत समिती मा. सभापती विठ्ठलराव शिंदे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक छबन महाराज कडू संचालक उमेश बोडके, संचालक भरत लिमण, देहूरोड कॅन्टोमेंटचे मा उपाध्यक्ष रघुवीर शेलार, मा. सभापती एकनाथ टिळे, शिवसेना नेते शांताराम भोते, भाजपा संपर्क प्रमुख सरपंच राजुशेठ मुऱ्हे, उपसरपंच नितिन मुऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस मा. जिल्हा अध्यक्ष संतोष मुऱ्हे, मा सरपंच मनोज येवले तसेच नवनिर्वाचित संचालक आढले ग्रामपंचायत मा. सरपंच देवेंद्र घोटकुले, दत्ता राक्षे, महेश भेगडे, सुनिल दाभाडे, महेंद्र गायकवाड, दिलीप सावंत, खंडूशेठ वाळुंज, प्रकाश पापळ, दिनेश सरोदे, तान्हाजी बोडके, सचिन भेगडे, संतोष कडू, राजाराम पाटील, ॲड. दिपक चव्हाण, ॲड. शाबू मुऱ्हे, ॲड अभिजित जांभुळकर, ऑडिटर अभिजित काळे त्याचप्रमाणे सर्व शाखांचे संचालक सल्लागार मंडळ उपस्थित होते, आमदार सुनिल शेळके यांनी पतसंस्थेच्या कामकाजाला तसेच संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. लक्ष्मण शेलार व सीईओ अमोल गवारे, शाखा व्यवस्थापक माधव रामदासी यांनी केले आभार सल्लागार हनुमंत कातोरे यांनी मानले.