पुणे : विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान, पुणे जिल्हा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्री समर्थ शिक्षण संस्था यांना “उत्कृष्ठ शिक्षण संस्था पुरस्कार” राज्यपाल मा. राजेंद्रजी अर्लेकर (राज्यपाल, केरळ) यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील १५ शाळांना हा प्रतिष्ठेचा बहुमान मिळाला. त्यापैकी श्री समर्थ शिक्षण संस्थेने आपल्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यामुळे विशेष ठसा उमटवला आहे.
संस्थेच्या वतीने समाजाभिमुख उपक्रम म्हणून “किल्ले बनवा स्पर्धा”, “पाढे पाठांतर स्पर्धा”, “कमवा आणि शिका योजना”, “ज्ञानेश्वरी पठण” अशा विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव गवारी, सचिव सौ. विद्याताई गवारी, तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
संस्थेच्या या यशामुळे परिसरातील शैक्षणिक व सामाजिक कार्यास नवी प्रेरणा मिळाली आहे.






