श्री समर्थ इंग्लिश मेडीयम स्कूल,चिंबळी फाटा येथील ८वी च्या विद्यार्थ्यांनी श्री शिवाजीराव गवारे सर आणि विद्या गवारे मॅडम यांच्या प्रेरणेतून “नशा मुक्त भारत” हे पथनाट्य मंत्रा मॅजिक, चिंबली चौक, महादेव मंदिर चौक येथे १२ऑगस्ट २०२४ या दिवशी सादर केले. या पथनाट्यमध्ये पुढीलप्रमाणे विध्यार्थी सहभागी होते.
अंश शर्मा, युवराज शिंग, प्रवीण यादव, संग्राम टिंगरे, पृथ्वीराज गरड, प्रसन्न शिंदे, सार्थक घाडगे, श्रेयश वर्दे, वैष्णवी रावडा, श्रेया गिरी, श्रेया पाटील, दयनानेश्वरी कदम, डिम्पल परदेशीं, मनस्वी पाटील, समृद्धी जाधव, राधा गुप्ता, उन्नती करवंदे, आर्या पांडे, सुप्रिया टेकवार, कारण राजपूत, वेदांत गुंड, महेश चौधरी.
मा. प्रचार्या सौ. अनिता टिळेकर मॅडम व प्रचार्या विद्या देशमुख मॅडम तसेच सर्व पर्यवेक्षक तांबे मॅडम, मुंगसे मॅडम, सपना मॅडम, दिपाली मॅडम,समन्वयक ललिता बडदे मॅडम,शुभांगी भोंडे मॅडम, मेघा उपाध्ये मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.
या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी व्यसना चे वाईट परिणाम व त्या मुळे होणारी कुटुंब हानी या विषयांवरती चिंबली गाव येथे ठिकठिकाणी जाऊन समाजप्रबोधन केले.आपण व आपल्या परिवारास कसे व्यसना पासून दूर राहिले पाहिजे ह्याचा प्रसार केला.
हे पथनाट्य सादरीकरणाच्या वेळी उपस्थित असणारे शिक्षक -पटले मॅडम, शीतल मॅडम, अवंतिका मॅडम, शेख सर, कांबळे सर . या पथनाट्याला पालकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
” श्री समर्थ स्कूल च्या आठवी च्या विद्यार्थ्यांनी जे व्यसन मुक्ती वर पथनाट्य सादर केलं ते ज्यांनी सुरवाती पासून बघितलं असेल त्यांच्या मध्ये थोडा तरी बदल होईल अशी अपेक्षा आहे . ह्या मुलांचा हा अतिशय उत्कृष्ट प्रयत्न होता.”