स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली पथनाट्याद्वारे जनजागृती

चिंबळी फाटा येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी ” संस्कारों का महत्व” या विषयावर पंचक्रोशीतील गावात जाऊन पथनाट्याद्वारे जनजागृती केली. या पथनाट्याच्या माध्यमातून आपल्या संस्कृती चे पालन व संस्काराचे पालन व्हावे हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
हा उपक्रम राबवताना पालकांचे उत्तमप्रकारे सहयोग मिळाला. हा उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव गवारे सर सचिव माननीय सौ. विद्याताई गवारे मॅडम प्राचार्य माननीय सौ.अनिता टिळेकर मॅडम व सौ. वर्षा देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. तसेच वर्गशिक्षिका वैशाली पटले मॅडम व सौ. राधा सोंडगे मॅडम यांनी पथनाटयासाठी मुलांना मार्गदर्शन केले.

news portal development company in india
marketmystique