श्री समर्थ स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय डान्स स्पर्धेत यश…..

पिंपरी चिंचवड शहरातील आचार्य अत्रे रंगमंदिरात डान्स विथ म्युझिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उडान 2.0 या एकदिवसीय राज्यस्तरीय आंतर शालेय भव्य डान्स स्पर्धेचे (Dance competition) बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. सर्व प्रथम नटराज यांच्या मुर्ती चे पुजन व दिप प्रज्वलन करून डान्स स्पर्धेत सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत जवळपास शहरातील सर्वच शाळेने सहभाग नोंदवला होता .
इयत्ता ४ थी ते ६ वी च्या गटातील स्पर्धेत श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल नाणेकरवाडीच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
त्याचप्रमाणे मोठ्या गटातील स्पर्धेत श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल नाणेकरवाडीच्या विद्यार्थ्यांनी दुसरा क्रमांक मिळवला.
या सर्व विद्यार्थ्यांना रोहित सर , जाधव सर , अमोल सर व त्यांच्या संपूर्ण टीमचे मार्गदर्शन मिळाले होते .कार्यक्रमास पर्यवेक्षक म्हणून वैभव घुगे सर आणि दिपक हुलसुरे सर यांनी काम बघितले .

सर्व विजेता स्पर्धक विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक रोहित सर व त्यांच्या टीमचे श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक / अध्यक्ष- मा श्री. शिवाजीराव बबनराव गवारे सर व संस्थेच्या संस्थापिका / सचिव- सौ. विद्याताई शिवाजीराव गवारे मॅडम यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी श्री समर्थ स्कूलच्या ( नाणेकरवाडी) प्राचार्य सौ विद्या पवार , पर्यवेक्षक सौ अश्विनी देवकर , सौ रेश्मा पवार , सौ अंकिता बोरकर , हसीना मानियार , श्री कुलकर्णी सर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते .

news portal development company in india
marketmystique