चिंबळी फाटा : छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजोमय इतिहास समाजात पोहचण्यासाठी श्री समर्थ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे यांच्या विचार व मार्गदर्शनातुन श्री समर्थ ग्रुपतर्फे दरवर्षी भव्य किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली जाते, सदर स्पर्धेचे हे ०९ वे वर्ष असुन दरवर्षी दिवाळीला खेड तालुका व पंचक्रोशीतील विद्यार्थी किल्ले बनवतात, बनविलेल्या किल्ल्यांचे श्री समर्थ ग्रुपकडून परीक्षण केले जाते त्यामधून तीन क्रमांक काढले जातात, सदर क्रमांकांना किल्ले शिवनेरी येथे बक्षिस दिले जाते त्याचप्रमाणे ग्रुपतर्फे सहभागी स्पर्धकांना किल्ले शिवनेरी येथे मोफत सहलीचे आयोजन केले जाते, या वर्षीही शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी ग्रुपतर्फे किल्ले शिवनेरी येथे मोफत आयोजित केली आहे, तरी सर्व सहभागी स्पर्धकांनी मोफत सहलीचा आनंद घ्यावा.