चिंबळी फाटा : बँकींग क्षेत्रातील महत्वाचा मानला जाणार बँको ब्लु रिबन पुरस्कार सन २०२४ श्री समर्थ पतसंस्थेस सलग दुसऱ्यांदा जाहीर झाला आहे.
सहकार क्षेत्रात काम करत असलेल्या बँका व पतसंस्था यांना अविझ पब्लिकेशन्स व गॅलॅक्सी इनमा या संस्थांच्या वतीने दरवर्षी बँको ब्लु रिबन पुरस्कार देण्यात येतो. राज्यातील संस्थांकडून आर्थिक स्थिती, थकबाकी, एनपीए, संस्थांनी केलेले सामाजिक उपक्रम व इतर बाबींची माहिती मागवली जाते, यातुन सर्व संस्थांचे परिक्षण करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पतसंस्थांना बँको ब्लु रिबन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाही श्री समर्थ पतसंस्थेस रुपये ७५ ते १५० कोटी विभागातील उत्कृष्ट पतसंस्था म्हणुन पुरस्कार जाहीर करण्यात आला असुन दिनांक २९ ते ३१ जानेवारी २०२५ रोजी सहकार परिषद घेऊन सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे यांनी सर्व संचालक सल्लागार मंडळ, सभासद, हितचिंतक यांचे आभार मानले आहे.