श्री समर्थ विद्यालयाचा ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के

चिंबळी ता.२२ – श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शासकीय रेखा कला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाकडून 25 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. गेली दोन वर्ष विद्यालयास उपकेंद्र मिळाले असून विद्यालयाकडून परीक्षेचे उत्तम नियोजन केले जाते.
श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक या उपकेंद्रातून इंदिराजी माध्यमिक विद्यालय मोई ,आनंद इंग्लिश मीडियम स्कूल कुरुळी, D.V.J. इंटरनॅशनल स्कूल चिंबळी, तसेच श्री समर्थ विद्यालयाच्या चिंबळी,निघोजे, खराबवाडी, खालुम्ब्रे या शाखातील एकूण 338 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. श्री समर्थ विद्यालयातील 158 विद्यार्थ्यांपैकी ए ग्रेड मध्ये 19 विद्यार्थी, बी ग्रेड मध्ये 53 विद्यार्थी तर 86 विद्यार्थी सी ग्रेडने उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्रीहरी पांचाळ, शीतल जाधव, मयुरी उपासनी, आसावरी वैद्य, अस्मिता पाटील, प्रियंका येळवंडे, प्राचार्य व उपकेंद्र संचालक अनिता टिळेकर, पर्यवेक्षक मोनाली मुंगसे शोभा तांबे,सपना टाकळकर,अजित थोरात, रूपाली सपकाळ,वैशाली पटले, मीनाक्षी पाटील, सुरज सोमवंशी ,पूजा लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक जुबेर शेख, कृष्णकांत कांबळे, देवयानी जाधव, सचिन जगताप, निखिल कांबळे, सिद्धेश्वर धोंडगे, दिपाली थोरात,विशाल डोळस यांचे सहकार्य लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव गवारे सर, सचिव मा.सौ.विद्याताई शिवाजीराव गवारे मॅडम, प्राचार्य वर्षा देशमुख,प्रा.विद्या पवार प्रा.पल्लवी कुटे, प्रा.वंदना यादव, प्रा.अनिता लंके,पर्यवेक्षिका अश्विनी देवकर प्रा.विद्या सावंत, सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

news portal development company in india
marketmystique